टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील आंदर मावळ येथील कुणे गावाजवळील नागमोडी वळणावर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या सुरक्षा कठड्याला अज्ञात वाहनाने मागील महिन्यामध्ये धडक दिली होती. परिणामी पूलाचा एका बाजूचा कठडा तुटला होता. तीव्र वळणावर हा पूल असून कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. ( kune village bridge safety wall construction completed andar maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक माध्यमांत याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच टीम दैनिक मावळनेही याचा पाठपुरावा केला होता. अखेर माध्यमांच्या रेट्याची आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने हा कठडा बांधून पूर्ण केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी खंडू आगळमे, जालिंदर मेठल, दामू करवंदे, राघुजी तळपे, रामदास काठे, आमदार सुनिल शेळके यांचे सहकारी नारायण मालपोटे, माजी उपसरपंच बाळासाहेब खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले आदींनी त्या ठिकाणी जाणून पाहणी केली होती. त्यानंतर पुलाची परिस्थिती पाहून अखेर सुरक्षा कठडा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांच्याकडून सदर पुलावरील तुटलेल्या सुरक्षा कठड्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान पूर्ण झालेल्या कामामुळे या भागातून नेहमी ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवाशांना, स्थानिक नागरिक आदींना यामुळे दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी माध्यमे आणि लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे.
अधिक वाचा –
– मावळात विकास कामांचा धडाका!! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तीन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनिल शेळकेंचे वजन वाढतंय..! आमदार शेळकेंवर पक्षाकडून पुन्हा मोठी जबाबदारी, जाणून घ्या