नवलाख उंब्रे ( Navalakh Umbare ) येथील लार्सन अँड टुब्रो ( Larsen And Toubro ) कंपनीतील ( एल अँड टी कंपनी ) कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल कामगारांनी मागील 43 दिवसांपासून कंपनी प्रशासनाविरोधात ठिय्या पुकारला होता. कामगारांच्या या आंदोलनाची धग सर्वत्र पसरली होती. अशात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 2 डिसेंबर (शुक्रवार) रोजी तळेगाव एमआयडीसी बंद करण्याच्या आंदोलनाची हाक दिली होती.
मात्र, गुरुवार (1 डिसेंबर) रात्रीपर्यंत कामगार आयुक्त आणि L & T कंपनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार शेळके यांनी स्वतः याची माहिती कामगारांना दिली. ( Larsen And Toubro Company Worker Agitation MLA Sunil Shelke Talegaon MIDC Bandh Movement Suspended )
‘कंपनी प्रशासन आणि कामगार आयुक्त यांनी आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन सोमवारपर्यंत काही कामगारांना कामावर घेण्याचा आणि त्यानंतर उर्वरित काही कामगारांना टप्प्या टप्प्याने कामावर घेण्याचा तसेच कंपनीच्या प्लँटमध्येच पुन्हा आहे तिथेच रुजू करुन घेण्याचा निर्णय घेण्याबद्दल सकारात्मक भुमिका घेतली असून सोमवारपर्यंत कंपनी प्रशासनाने ठोस अहवाल देण्याचे आश्वास दिले आहे. तसेच कामगार आयुक्त यांनीही कामगारांच्या बाबत सकारात्मक भुमिका घेतली असून यांनी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांना सोमवारपर्यंत वेळ देऊयात आणि उद्याचं आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत. मात्र, सोमवारपर्यंत काही ठोस निर्णय न झाल्यास काय करायचे हे ठरवूयात,’ अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी कामगारांशी संवाद साधताना दिली.
अधिक वाचा –
– एल अँड टी कंपनीतील उपोषणकर्त्या कामगारांसाठी खासदार श्रीरंग बारणेही मैदानात; मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना निवेदन
– महत्वाची बातमी! दिनांक 4 डिसेंबर रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, बेरोजगारांना नोकरींची सुवर्णसंधी
– ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा