व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करणार ; कृषिमंत्र्यांचा इशारा

कोणत्याही स्वरूपात खतासोबत लिंकिंग केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 4, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
fertilizers-stock

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कोणत्याही स्वरूपात खतासोबत लिंकिंग केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे घाऊक व किरकोळ खत विक्री करणाऱ्या राज्यातील सर्व विक्रेत्यांच्या ‘माफदा’ या संघटनेमार्फत पुकारलेल्या खत खरेदी बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी संचालक सुनिल बोरकर, खत पुरवठादार,उत्पादक कंपन्या व ‘माफदा’ संघटनेचे सदस्य यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, खत विक्रते यांनी लिंकिंगचे कोणतेही खत खरेदी करू नये व सक्ती झाल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. तालुका व जिल्हापातळीवर देखील याबाबत कृषी विभागाने सक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश यावेळी कृषिमंत्री यांनी दिले.

खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील यापुढे कोणत्याही स्वरूपात लिंकिंग न करण्याचे आश्वासन बैठकीत उपस्थित विक्रेता संघटना व विभागाला दिले. ‘माफदा’ संघटनेमार्फत कृषिमंत्री यांचे आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खते, कीटकनाशके बियाणे विक्रेते संघटनेने (माफदा) खत खरेदी बंदचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. ‘माफदा’ संघटनेच्या वतीने अध्यक्ष विनोद तराळ व सचिव बिपिन कासलीवाल यांनी संघटनेचे म्हणणे मांडले.

विनोद तराळ यांनी सांगितले की, कंपन्यांच्याद्वारे लिंकिंगमध्ये खतपुरवठा होत असल्यास त्यावर शासनाने कठोर भूमिका घ्यावी. याअनुषंगाने खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया या उत्पादकांच्या संघटनेचे सचिव डी रामाकृष्ण व महाराष्ट्र शाखेचे प्रतिनिधी सुरेश शेटे यांनी खत उत्पादक कंपन्यांची बाजू मांडली. अनुदानित खतांबाबतची स्थिती तसेच जमिनीची सुपीकता राखण्यासाठी सेंद्रिय, जैविक, नॅनो खते वापरण्यासंदर्भातील धोरणाबाबत माहिती दिली.

अधिक वाचा –
– वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक । Pune News
– पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ‘असा’ करा अर्ज । Pune News
– पवना धरणात अवघा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक ! 30 जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam
– राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडूंना घवघवीत यश । Lonavala News


Previous Post

नागरिकांना आवाहन… परिसरात अनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास महिला व बालविकास विभागास कळवावे

Next Post

पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indian-Railway

पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.