खोपोली (जि. रायगड) लायन्स क्लब खोपोली नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असतात. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून मागील वर्षी प्रमाणे यंदाही लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी आणि ला. महेश मोदी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या फ्रंटलाइन वर्कर्सचा दहा लाख रुपये एवढ्या रकमेचा विमा उतरवला असून त्याचे वितरण लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष ला. अतिक खोत, खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत केले गेले.
खालापूर तालुका नव्हे तर रायगड जिल्हा आणि जिल्हा बाहेरउद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आपला जीव धोक्यात घालून आणि सामाजिक जबाबदारी समजून मदतकार्य करत असतात. त्या सर्व जिगरबाज सदस्यांच्या कार्याचे कौतुक आणि प्रोत्साहन म्हणून ला.शिल्पा मोदी आणि ला.महेश मोदी यांनी यंदाही मॅग्मा HDI जनरल इन्शुरन्स लि. ची विमा पॉलिसी काढून आपल्या परीने मदत केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
डॉ. रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात या पॉलिसीचे वितरण केले गेले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण जरी प्रत्यक्ष मदत करू शकलो नसतो तरी अश्या माध्यमातून खारीचा वाट्याचे योगदान दिल्याचे समाधान आपल्याला लाभत असल्याचे ला. शिल्पा मोदी यांनी प्रतिपादन केले. अपघात संस्थेच्या वतीने गुरुनाथ साठेलकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ( Lions Club provides insurance cover to frontline workers rendering emergency services Khopoli News )
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘घर चलो अभियान’, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मावळ लोकसभा दौऱ्यावर, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी साधणार संवाद
– महाराष्ट्र सरकारची मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’, मुलींना करणार लखपती! वाचा काय आहे योजना?
– कामशेतमध्ये मतदार नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत 679 नवीन मतदार नोंदणी