लोणावळ्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण रविवारी (दि. 30 जून) सकाळी ओव्हरफ्लो झाले. त्यात सुटी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात दाखल झाले होते. यात पुण्यातील अन्सारी कुटुंब आणि त्यांचे काही नातेवाईक देखील होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याखाली जलविहारासाठी अन्सारी कुटुंब गेलं आणि तिथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं. यात वाहून गेलेल्या पाचही जणांचे शव शोधण्यात रेस्कू टीमला यश आले आहे. सोमवारी (दि. 1 जुलै) सायंकाळी पाचवी डेडबॉडी सापडल्यानंतर शोधकार्य पूर्ण झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नूर शाहिस्ता अन्सारी (वय 35), अमिना अदिल अन्सारी (वय 13), मारिया अन्सारी (वय 7), हुमेदा अन्सारी (वय 6) आणि अदनान अन्सारी (वय 4, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावे असून या सर्वांचे शव शोधण्यात रेस्कू टीमला यश आले आहे.
लोणावळा पोलिस, शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ यांचे राजेंद्र कडू, मनाली कडू, सचिन गायकवाड सर, आयुष वर्तक, निलेश गराडे, शिवराज गायकवाड, आदित्य पिलाने, अमोल परचंड, आकाश मोरे, मोरेश्वर मांडेकर, मनोहर ढाकोळ, अनिल सुतार, अशोक उंबरे, गौरव कालेकर, महादेव भवर, मयूर दळवी, ओंकार वायकर, विजय साळवे, न पा . टीम, आनंद गावडे, अनिश गराडे, महेश मसने, कुणाल कडु, सिध्देश निसाळ, हर्षल चौधरी, प्रिन्स बैठा, अभिजीत बोरकर, योगेश दळवी, सुनिल गायकवाड यांनी या शोधकार्यात सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– असं व्हायला नको होतं.. पर्यटनाला गालबोट लागले.. लोणावळा असं नाहीये.. चुक नेमकी कुणाची ? । Lonavala News
– वडगावकरांनो.. पाणी जपून वापरा !! रविवार – सोमवार पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता
– लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले