Dainik Maval News : लोणावळा शहरातील लाडक्या गणपती बाप्पांना सात तासांच्या जल्लोषपूर्ण विसर्जन मिरवणूकीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरात संध्याकाळी सुरु झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री एक वाजण्याच्या सुमारास बंद झाली. मात्र घाटावर नंबर लागल्याने शेवटचा गणपती विसर्जन होण्यासाठी मध्यरात्री सव्वा दोन वाजले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहरातील 19 सार्वजनिक गणेश मंडळानी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. तर इतर 3 मंडळांनी मुख्य मिरवणुकीपूर्वी आपल्या मूर्तीचं विसर्जन केले होते. डॉल्बी सिस्टमवर असलेल्या निर्बंधामुळे यंदा याचा कमी वापर होईल असे वाटत असतानाच यावर्षी नेहमीच्या पेक्षा जास्त संख्येने डीजे डॉल्बी मिरवणुकीत दिसून आले.
- लोणावळा शहरातील पहिला मनाचा गणपती रायवूड गणेशोत्सव मंडळाचा गणपती सर्वप्रथम 6 वाजता शेतकरी पुतळा चौकात विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला. त्यानंतर तरुण मराठा मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गवळीवाडा आणि शेतकरी भजनी मंडळ, वलवण हे अनुक्रमे मानाचे सर्व गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाले.
सर्व गणेश मंडळांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांच्या सोबतच लोणावळा नगरपरिषद आणि सत्यनारायण कमिटी यांचे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.
आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी अशोक साबळे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, पो. नि. सुहास जगताप यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
अधिक वाचा –
– रविंद्र भेगडे यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित । Maval News
– प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा – पुणे जिल्हाधिकारी
– वडगाव शहरातील मंडल अधिकारी व तलाठी अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण । Vadgaon Maval