व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील बाप्पांना वाजतगाजत निरोप, सात तास चालली गणरायाची विसर्जन मिरवणूक । Lonavala News

लोणावळा शहरातील लाडक्या गणपती बाप्पांना सात तासांच्या जल्लोषपूर्ण विसर्जन मिरवणूकीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 19, 2024
in लोकल, शहर
Lonavala City Ganesh Immersion Procession 2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील लाडक्या गणपती बाप्पांना सात तासांच्या जल्लोषपूर्ण विसर्जन मिरवणूकीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरात संध्याकाळी सुरु झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री एक वाजण्याच्या सुमारास बंद झाली. मात्र घाटावर नंबर लागल्याने शेवटचा गणपती विसर्जन होण्यासाठी मध्यरात्री सव्वा दोन वाजले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोणावळा शहरातील 19 सार्वजनिक गणेश मंडळानी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. तर इतर 3 मंडळांनी मुख्य मिरवणुकीपूर्वी आपल्या मूर्तीचं विसर्जन केले होते. डॉल्बी सिस्टमवर असलेल्या निर्बंधामुळे यंदा याचा कमी वापर होईल असे वाटत असतानाच यावर्षी नेहमीच्या पेक्षा जास्त संख्येने डीजे डॉल्बी मिरवणुकीत दिसून आले.

  • लोणावळा शहरातील पहिला मनाचा गणपती रायवूड गणेशोत्सव मंडळाचा गणपती सर्वप्रथम 6 वाजता शेतकरी पुतळा चौकात विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला. त्यानंतर तरुण मराठा मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गवळीवाडा आणि शेतकरी भजनी मंडळ, वलवण हे अनुक्रमे मानाचे सर्व गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाले.

सर्व गणेश मंडळांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांच्या सोबतच लोणावळा नगरपरिषद आणि सत्यनारायण कमिटी यांचे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.

आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी अशोक साबळे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, पो. नि. सुहास जगताप यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

अधिक वाचा –
– रविंद्र भेगडे यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित । Maval News
– प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा – पुणे जिल्हाधिकारी
– वडगाव शहरातील मंडल अधिकारी व तलाठी अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण । Vadgaon Maval


Previous Post

Maval Vidhan Sabha : सुनिल आण्णांनी कसलीये कंबर.. रवी आप्पा अन् बापू साहेबांनी बी लावलाय नंबर.. कोण असणार महायुतीचा मेंबर?

Next Post

केंद्राच्या ‘एक देश – एक निवडणूक’ निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Eknath Shinde

केंद्राच्या 'एक देश - एक निवडणूक' निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.