खंडाळा (शिवाजी पेठ) येथे अवैधरीत्या देशी आणि विदेशी दारूचा साठा करत त्याची विक्री करणार्या एका व्यक्तीवर लोणावळा शहर पोलिसांनी शुक्रवारी (30 डिसेंबर) रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत त्याच्याकडील तब्बल 68 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) अन्वेय ही कारवाई करण्यात आली. ( Lonavala city police seize illegal liquor stock at Khandala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खंडाळा पोलीस चौकीला नेमणूकीस असलेले लोणावळा शहरचे पोलीस हवालदार मयुर अबनावे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अजय रामचंद्र जांभुळकर (वय 56 वर्षे रा शिवाजी पेठ खंडाळा,पुणे) यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. जांभूळकर यांच्याकडे 52 प्रकारच्या देशी आणि विदेशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. त्या सर्वांची किंमत ही 68 हजार 220 रुपये असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळा पोलिसांची धडक कारवाई, सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
– कोथुर्णेच्या निर्भयाला न्याय द्या, मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अजितदादांची सभागृहात मागणी – पाहा व्हिडिओ
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स करिता मावळ तालुक्यात आरटीओचा मासिक दौरा