Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मतमोजणी रविवारी (दि. २१) लोणावळा नगरपरिषद इमारतीच्या तळमजल्यावर सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. प्रशासनाच्या वतीने मतमोजणीसाठी प्रभागनिहाय १३ टेबल लावण्यात येणार असून, सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.
नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. तर नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय फेऱ्यांत मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक १, २ व १२ साठी चार फेऱ्या, प्रभाग क्रमांक ३, ४, ६, ७ व ११ साठी पाच फेऱ्या, तर प्रभाग क्रमांक ८, ९ व १३ साठी सहा फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे.
तसेच, २ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ५अ व १०ब साठी झालेल्या मतदानासाठी चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर २० डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ५ब व १०अ साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी त्याच टेबलवर चार फेऱ्यांत केली जाणार आहे.
लोणावळा नगरपरिषद तळमजल्यावरील पार्किंगच्या जागेत मतमोजणी होणार असल्याने याठिकाणी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मतमोजणी केंद्र सुरक्षेत त्रुटी राहू नये यासाठी परिसरातील रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंद असलेल्या रस्त्यांवरील सर्व दुकाने, हॉटेल्स व भाजी मार्केटही निर्देशित वेळेत बंद राहणार आहेत. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन, पोलिस यंत्रणा सज्ज असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

