Dainik Maval News : अनेकदा रेल्वेने प्रवास करताना आपल्या काही मौल्यवान वस्तू, महत्वाची कागदपत्रे, मोबाइल इत्यादी गोष्टी हरवतात. एकदा का या वस्तू हरवल्या की, त्या पुन्हा माघारी मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे होणारा त्रास, मनस्ताप, दुःख हे मात्र मोठं असतं. असंच काहीसं सोनाली गोरे या रेल्वे प्रवासी महिलेसोबत झालं. परंतु त्यांची हरविलेली वस्तू सहीसलामत त्यांना पुन्हा मिळाली आहे.
सोनाली गोरे या दिनांक 2 सप्टेंबर 2024 या दिवशी शिवाजीनगर ते लोणावळा या लोकलने प्रवास करीत होत्या. प्रवासात सोनाली गोरे यांचे तीन तोळे सोने आणि काही महत्वाची कागदपत्रे असणारी बॅग लोकल ट्रेनमधे राहून गेली. घरी गेल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या. त्यानंतर त्यांनी लोणावळा रेल्वे पोलीस यांच्याशी याबाबत संपर्क साधला.
तेव्हा तिथे असणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकारी अनिता रायबोले यांच्यासोबत त्या बोलल्या, रायबोले यांनी अगोदर सोनाली यांना मानसिक आधार दिला. त्यानंतर तक्रार कुठे आणि कशी नोंदवायची याबाबत मार्गदर्शन केले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर रायबोले यांनी व टीमने तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर हरवलेली बॅग शोधली आणि ती बॅग सोनाली गोरे यांना पुन्हा सुपूर्द केली. बॅग पुन्हा हाती आल्यानंतर सोनाली या प्रचंड आनंदी झाल्या आणि त्यांनी अनिता रायबोले यांचे मनापासून आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण, मावळमधील धक्कादायक प्रकार
– सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा सह एकाला अटक, तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime
– संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय