दोन दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर लोणावळा शहरात पावसाचा जोर पपुन्हा वाढला आहे. गुरूवारी 24 तासात लोणावळा शहरात तब्बल 148 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. सोमवार आणि मंगळवारी पावसाने जवळपास विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवारी पावसाने कमबॅक केले. त्यानंतर गुरुवारी मात्र दिवसभर मुसळधार सरी बरसल्या. शहरात गुरूवारी 5.83 इंच इतका पाऊस झाला आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 1837 मी.मी इतका पाऊस झाला असून गतवर्षीपेक्षा आजमितीस लोणावळा शहरात जास्त पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहर आणि परिसरातील नदी नाले , यामुळे दुथडी भरून वाहत असून डोंगरांवरील वाहणाऱ्या धबधब्यांचे प्रवाह देखील वाढले आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी पावसाचा आणि पाण्याचा अंदाज घेऊन पर्यटन करावे, पोलिसांच्या सोबतच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सोबत नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून जोरदार पावसात घराबाहेर न पडावे, अतिमुसळधार पाऊस असताना गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे सांगण्यात आले आहे. ( Lonavala Rain Updates 148 mm Rain in 24 Hours Citizens Urged to take Care )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News
– लहान वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये आकर्षक रिंगण सोहळा संपन्न । Talegaon Dabhade
– आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News