लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगांव इथे काही व्यक्ती अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत. त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर आणि नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्या माहितीवरून आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी आज, शुक्रवार (दि. 29 डिसेंबर) रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. तेव्हा मौजे वेहेरगाव इथे मोकळ्या रानामध्ये एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटक्याचे नंबर घेणारे दोन एजंट आणि मटका लावणारे 10 व्यक्ती यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि इतर असा एकूण 2 लाख 50 हजार 485 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ( Lonavala Rural Police And IPS Satyasai Karthik raided Matka Adda in Vehergaon Village Maval )
सदरच्या व्यक्तींकडे केलेल्या प्राथमिक तपासात 1) चंद्रकांत देवकर, 2) शंकर बोरकर, 3) निलेश बोरकर, 4) संतोष बोत्रे हे सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 16 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पो हवा सचिन गायकवाड, पो हवा अंकुश नायकुडे, पोना रईस मुलानी, पो शी सुभाष शिंदे, होमगार्ड सागर दळवी यांचे पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– बाळाभाऊ खासदार होणारच..! माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या वाढदिवसानिमित्त मावळ मतदारसंघात समर्थकांची जोरदार बॅनरबाजी
– तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा जांबवडे गावात छापा; बेकायदा गावठी दारूचा साठा आणि विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
– राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंदर मावळातील पहिल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात