लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे. जर एखाद्या घरमालकाकडे कुणी भाडेकरू असेल, तर अशा भाडेतत्वावर राहणाऱ्या व्यक्तींची माहिती विहित नमुन्यात भरून ती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही माहिती 7 दिवसांत देणे घरमालकांना बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी आदेश पारित केला आहे. ( Lonavala Rural Police Appeal House Owners For Submission Of Information About Tenants )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर सुचनेनंतर सात दिवसांच्या आत सर्व घरमालकांनी त्यांच्याकडे भाडे तत्वाने राहत असलेल्या भाडेकरू यांची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे न चुकता सादर करावी. तसेच, जे घरमालक भाडेकरूंची माहिती सादर करणार नाहीत, अशा घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन
– सोशल मीडियाची कमाल; डोंगरगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलाचा अवघ्या 3 तासात शोध