सोमवारी अर्थात उद्या दिनांक 13 मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मावळ लोकसभेत यावेळी अटीतटीचा सामना रंगण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सध्या होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यापार्श्वभूमीवर आणि मावळ लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणामध्ये पार पडावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये, मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा आणि निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणामध्ये पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ( Lonavala rural police route march before Polls For Maval Lok Sabha )
शुक्रवारी (दि. 10 मे) पुणे ग्रामीण पोलिसचे लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने कार्ला आणि वाकसई परिसरामध्ये रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह सर्व दुय्यम अधिकारी, पोलीस अंमलदार, शीघ्र कृती दलाचे पथक असा मोठा पोलीस ताफा सहभागी झाला होता.
अधिक वाचा –
– डॉ. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसने दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश । Maval News
– अभिनंदन ! युरोपातील रोमानिया देशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठण्यात येणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये क्षितिजा मरागजे हिची निवड
– तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले