लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व पर्यटन स्थळांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही पोलिसांची नजर चुकवून सार्वजनिक ठिकाणी हुक्का पित असलेल्या एकाला हुक्का साहित्यासह पकडण्यात आले आहे. सोमवारी (दि. 15 जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास आतवण गावच्या हद्दीतील लायन्स पॉइंट येथे ही कारवाई करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमार शब्बीर पटेल (वय ३० वर्षे, रा. तळोजा जि. रायगड) असे कारवाई करण्यात आलेल्या संबंधित व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय) अधिनियम 2003 चे सुधारीत अधिनियम 2018 चे कलम 4(अ) आणि 21 (अ), भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह पर्यटन बाबत नियमांचे आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंन करणाऱ्या एकुण 8 व्यक्तींवर आतापर्यंत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Lonavala rural police take strict action against people smoking hookah in public places Crime News )
लोणावळा परिसरात सतत पाऊस पडत असून त्यामुळे परिसरातील नदी, नाले, धबधब प्रवाहित झाले असून भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. पर्यटकांना पाण्याचा अंदाज नसताना त्यांनी पाण्यात प्रवेश करू नये, तसेच नशापान करू नये, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करू नये, सोबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमांचे आणि आदेशाचे पालन करावे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे. तसेच यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
अधिक वाचा –
– लोणावळ्यातील शंकरबन प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ, लवकरच शिष्यवृत्ती सुरू करणार । Lonavala News
– डॉ. विकेश मुथा यांचा ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स’कडून धन्वंतरी पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade
– ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ , किल्ले लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी, बजरंग दलाचा अल्टिमेटम । Lohgad Fort