व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हृदयद्रावक ! पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा एक्सप्रेस वेवर अपघात, 5 जण ठार । Devotees Bus Accident On Mumbai-Pune Expressway

एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उद्या (दि. 17 जुलै) रोजी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या खासगी बसचा मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 16, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश
Devotees Bus Accident On Mumbai-Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Devotees Bus Accident On Mumbai-Pune Expressway : एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उद्या (दि. 17 जुलै) रोजी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर खासगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला, यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

प्राप्त माहितीनुसार, डोंबिवली येथील दोन ते तीन गावामधून एकूण चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खाली कोसळली. यात बसमधले अनेक प्रवासी जखमी झाले. तर बसमधील तीन भाविक ठार झाले. सोबत ट्र्क्टरचेही मोठे नुकसान झाले असून ट्रॅक्टर मधले दोन प्रवासी मृत पावले आहेत. बस आणि ट्रॅक्चमधील अनेकजण जखमी असून त्यांच्यावर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारकऱ्यांच्या बसचा अपघात झाल्याची दुर्घटना समजताच दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. ( Devotees bus from Dombivli to Pandharpur met with an accident on Mumbai Pune Expressway 5 killed )

वारकऱ्यांच्या बस आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातातील मृत आणि जखमींचा तपशील ;
बसमधील मृत प्रवासी :
1. गुरुनाथ बाबू पाटील -70
2. रामदास नारायण मुकादम – 70
3. हंसाबाई हरी पाटील – 60
ट्रॅक्टरवरील मृत प्रवासी :
1. तर्वेज सल्लाउद्दीन अहमद -28
2. अनोळखी ईसम -27

अपघातात गंभीर जखमी झालेले भाविक –
1. बाबुराव धर्मा भोईर
2. बामा पोग्या भोईर
3. गणपत जोग्या मुकादम
4. संजय बाबुराव पाटील
5. सुमंत साळुंखे
किरकोळ जखमी प्रवासी – 38
उपचार न घेता सुस्थितीत असलेले प्रवासी – 5

आषाढी एकादशीसाठी डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या खासगी बसचा अपघात हृदयद्रावक आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अपघातात जखमी झालेले वारकरी लवकरात लवकर बरे होवोत, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना !

ओम शांती!#Accident #BusAccident #OmShanti

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 16, 2024

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– डॉ. विकेश मुथा यांचा ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स’कडून धन्वंतरी पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade
– ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ , किल्ले लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी, बजरंग दलाचा अल्टिमेटम । Lohgad Fort
– जागतिक साप दिन : मावळ तालुक्यात आढळतात 37 प्रकारचे साप, त्यातील 8 साप आहेत विषारी । World Snake Day


dainik maval jahirat

Previous Post

पाऊस ओसरला मात्र पाण्याची आवक सुरूच, पवना धरणातील पाणीसाठा 34 टक्क्यांच्या पार । Pavana Dam Updates

Next Post

सार्वजनिक ठिकाणी हुक्का पिणाऱ्या व्यक्तीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कडक कारवाई । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Selling hookah

सार्वजनिक ठिकाणी हुक्का पिणाऱ्या व्यक्तीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कडक कारवाई । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.