मावळ तालुक्यातून ( Maval Taluka ) एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. मावळमधील लोणावळ्याजवळील ( Lonavla ) प्रसिद्ध भुशी डॅम धरणात ( Bhushi Dam ) बुडून एका अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुळ नेरळ येथे राहणारा रोहन जोगिंदर लाहोट (वय 16 वर्षे) हा तरुण भुशी डॅम धरणात बुडून मृत पावला आहे. ( Lonavla Bhushi Dam Youth Death By Drowning )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
डॅममध्ये तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र मंडळाच्या ( Shivdurg Mitramandal ) सदस्यांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. सचिन गायकवाड सर, योगेश उंबरे, अशोक उंबरे, अमित भोसले, ओंकार पडवळ, सागर कुंभार, अमोल चिनुरे, राजेंद्र कडु, अजय मयेकर, अमोल परचंड, अमोल सुतार, सुनिल गायकवाड या सदस्यांनी सर्च ऑपरेशन पुर्ण करत तरुणाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. शिवदुर्गच्या सदस्यांनी ऐन दिवाळीत केलेले हे रेस्क्यू ऑपरेशन खरोखरच अतुलनीय आहे.
अधिक वाचा –
– वडगाव मावळमध्ये 5 नोव्हेंबरपासून जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा I Weightlifting Competition
– PHOTO I आमदार सुनिल शेळकेंनी गोविंदबागेत घेतली पवार कुटुंबीयांची भेट