तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे काही दिवसांपूर्वीच निलंबन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अशोक साबळे यांनी तळेगाव नगरपरिषदेच्या विविध विभाग प्रमुखांकडून माहिती घेत गुरुवारी (दि. 11 जुलै) सकाळी आपला पदभार स्विकारला. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्यावर मद्य प्राशन करून वाहन चालविणे, तसेच नगरपरिषदेच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करण्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सोमवारी निलंबनाचे आदेश दिले आहेत. ( Lonavla City CEO Ashok Sable has additional charge of post of Talegaon Municipal Council )
दरम्यान, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे देण्यात आला. साबळे यांनी गुरुवारी सकाळी नगरपरिषदेतील विविध विभागप्रमुखांकडून कामकाजाची माहिती घेत पदभार स्विकारला.
अधिक वाचा –
– उंदीर पकडायच्या जाळीत अडकले नागोबा, सर्पमित्रांंकडून जीवदान
– वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा
– भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार…