व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, काही दिवसांपूर्वीच वडिलांचेही झाले होते निधन

काँग्रेस (आय) पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 30, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Balu-Dhanorkar

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


काँग्रेस (आय) पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. धानोरकर यांनी वयाच्या 48व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव एअर एम्ब्युलन्सद्वारे महाराष्ट्रातील त्यांच्या निवासस्थानी वरोरा इथे आणण्यात येणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बाळू धानोरकर हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने 28 मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना एअर एम्ब्युलन्सद्वारे नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते, परंतू अखेर आज मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ( Lone Congress MP from Maharashtra Balu Dhanorkar passes away at 48 )

कॉंग्रेस पक्षाचे चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी धानोरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी… pic.twitter.com/7eKiELulKi

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 30, 2023

Saddened to learn about the untimely passing away of Shri Suresh Narayan Dhanorkar, Congress MP (Lok Sabha) from Chandrapur Maharashtra. He was a grassroots leader.

Our deepest condolences to his family, friends and followers.

May they get the strength to overcome this loss. pic.twitter.com/gRO1ABPD4T

— Mallikarjun Kharge (@kharge) May 30, 2023

बाळू धानोरकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. खरेतर खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचेही चार दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांनंतर आज (दिनांक 30 मे) बाळू धानोरकर यांचेही निधन झाले. पिता-पुत्र्याच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुळचे शिवसैनिक असलेले धानोरकर हे शिवसेनेकडून आमदारही झाले होते. 2019 च्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा लढवली आणि जिंकली सुद्धा. मोदी लाटेत राज्यात निवडून येणारे ते काँग्रेसचे एकमेव खासदार होते.

अधिक वाचा –
– बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News


Previous Post

‘आपला परिसर, आपली जबाबदारी’ : शिवगर्जना मित्र मंडळाकडून टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम

Next Post

शिरगाव – सोमाटणे फाटा मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात, महिलेचा मृत्यू, धडक झाल्यानंतर कारचालक फरार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

शिरगाव - सोमाटणे फाटा मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात, महिलेचा मृत्यू, धडक झाल्यानंतर कारचालक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
Mla Sunil Shelke On Ncp Merger statement those who do not accept sunetra pawars leadership can take exit route

“अजून वेळ गेलेली नाही.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, पण..” आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

March 30, 2026
Vadgaon Nagar Panchayat Distribution of disability fund to disabled beneficiaries by Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

March 30, 2026
Kamshet-Police-Station

कामशेत हादरले… कामशेतमध्ये एकाचा खून ; गुन्हा लपविण्यासाठी साथीदारावर देखील जीवघेणा हल्ला । Kamshet Crime

March 30, 2026
Potoba-Maharaj-Mandir

वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ; तीन दिवसीय यात्रेत विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम

March 30, 2026
Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.