Taje Maval News : ताजे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया बुधवारी (दि. 19) पार पडली. यावेळी सोसायटीच्या चेअरमन पदी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे मा सरचिटणीस मच्छिंद्र मारुती केदारी यांची निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी गोरक्ष मोहिते यांची निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजपाचे विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे यांनी शाल आणि पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी प्रदेश भाजपा सदस्य जितेंद्र बोत्रे, मावळ भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, काळूराम केदारी, बबन केदारी, नरहरी केदारी, मा सरपंच बाळू पिंपळे आदी उपस्थित होते. ( Machindra Kedari elected as Chairman of Taje Cooperative Society )
अधिक वाचा –
– वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी
– खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे मावळमध्ये 70 वर्षीय आजोबांचा कर्करोग झाला बरा ! तळेगाव येथे राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया