Dainik Maval News : पंचायत समिती कार्यालय मावळ च्या वतीने राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सोमवारी (दि. १४ एप्रिल) दिवसभर ‘महावाचन अभियान’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वाचनातून महापुरूषांना अभिवादन करण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी ही माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या संयुक्त जयंती निमित्त मावळ पंचायत समितीच्या वतीने ‘महावाचन अभियान’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी ध्यानधारणा करून महावाचन अभियानाला सुरुवात होणार आहे. दिवसभर महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाचन केले जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता या उपक्रमाची सांगता होईल.
अभियानात सहभागी होऊन महापुरुषांच्या पुस्तकांचे वाचन करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केले आहे. वाचन करण्यासाठी पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील. अथवा आपण स्वतःचे पुस्तकही आणू शकता.
अभियानात सहभागी होण्यासाठी पंचायत समितीच्या प्रशासन विभागात ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates