Dainik Maval News : महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत याकरिता लोणावळ्यात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने भांगरवाडी गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी 7 वाजता ही महाआरती करीत फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी श्री गणेशाला साकडे घालण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाथव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, आशिष बुटाला, महिला अध्यक्षा विजया वाळंज आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विधानसभा 2024 ही निवडणूक राज्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात आली. त्यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादित केले आहे. भाजपा हा महाराष्ट्रात व महायुती मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपा कार्यकर्त्यांची भावना असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News
– कालभैरवनाथ जयंतीनिमित्त वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न । Vadgaon Maval
– खळबळजनक ! वेटरला मारहाण केल्याने हॉटेल मालकाकडून स्वतःच्या मित्राचा खून, मावळमधील धक्कादायक घटना । Maval Crime