Dainik Maval News : राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबतचा निर्णय सोमवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत,
सरपंचाचे मानधन – 3000 रुपये वरुन 6000 रुपये.
उपसरंपचाचे मानधन – 1000 रुपये वरुन 2000 रुपये
ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत,
सरपंचाचे मानधन – 4000 रुपये वरुन 8000 रुपये.
उपसरपंचाचे मानधन – 1500 रुपये वरुन 3000 रुपये.
ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त,
सरपंचाचे मानधन – 5000 रुपये वरुन 10,000 रुपये
उपसरपंचाचे मानधन – 2000 रुपये वरुन 4000 रुपये
राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून या मानधनवाढीपोटी राज्य शासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे. ( Maharashtra Cabinet decision to double the remuneration of Sarpanch and UpSarpanch )
अधिक वाचा –
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News
– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News
– निगडे गावातील साकव पूल, सभामंडप, नवीन विद्युत पोल, रस्त्यांचे प्रश्न मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार