मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बुधवारी (दि. 10 जानेवारी) सह्याद्री अतिथीगृह, मुंबई इथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा मोठा निर्णय घेण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक 22 जानेवारी पासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या 6 वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ( Maharashtra Govt decision to distribute Anandacha Shidha on occasion of Shri Ram Pran Pratistha Sohla and Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti )
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच “आनंदाचा शिधा” म्हणून वितरित करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा प्रति संच १०० रुपये या सवलतीच्या दरात वितरीत करण्यात येणार आहे. या वितरणाकरीता येणाऱ्या 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा दरम्यान सोमवारपासून दुपारच्या वेळेत लोकल धावणार, रेल्वे बोर्डाचा निर्णय; खासदार बारणेंची माहिती
– उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना’ – राहुल नार्वेकर यांचा अंतिम निकाल । Shiv Sena MLA Disqualification Case
– मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! बागायतदार शेतकरी चिंतेत, थंडीचा कडाका वाढणार । Unseasonal Rain