सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज (दि. 10 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना पक्षात 2022 मध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयानेही आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर यासंदर्भात राहुल नार्वेकरांसमोर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज (दि. 10 जानेवारी) निकाल देण्यात आला. ज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राहुल नार्वेकर यांनी केलेल्या निकाल वाचनातील महत्वाचे मुद्दे ;
निकाल वाचनाला सुरुवात करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात आले. तसेच, विधानसभा अध्यक्षांकडे ज्या 34 याचिका दाखल झाल्या त्यावर निकाल असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच सर्वात आधी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देणार आणि त्यानंतर आमदार अपात्रतेवर निर्णय देणार असल्याचेही नार्वेकरांनी सांगितलं.
खालील घटकांवर निकाल आधारीत –
1. मूळ शिवसेना पक्ष कोणता?
2. विधिमंडळ पक्षनेता कोण?
3. कोणत्या गटाचा व्हिप वैध?
4. कोणत्या गटाचे आमदार पात्र ठरतात?
निकाल देताना खालील मुद्द्यांचा विचार –
शिवसेनेच्या राज्यघटनेचा, पक्षीय संघटने, विधिमंडळ पक्षाचा विचार करून कोण मूळ राजकीय पक्ष आहे, याचा विचार करण्यात आला.
पक्षाच्या घटनेवर प्रामुख्याने बोट ठेवले –
समोर आलेल्या पुराव्यांनुसार निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या राज्यघटनेबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती नाही. त्यामुळे संदर्भासाठी योग्य ती पक्षाची घटना घेणं हा माझ्यासमोर पर्याय होता. निवडणूक आयोगाने 22 जून २०२३ साली मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंनी सादर केलेली पक्षाची घटना दुरुस्ती नाकारली –
“निवडणूक आयोगानं घटनेची एक प्रत दिली, पण त्यावर तारीख नाही. म्हणून शिवसेनेने जी घटना दिली, ती मान्य नाही.. दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. 2018 ला पक्षाच्या घटना जी दुरुस्ती करण्यात आली ती चूक आहे. ठाकरे गटाने 2018 मध्ये घटना दुरुस्ती केल्याचे सुनावणी म्हटले होते. मात्र, असे कोणतीही घटना दुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगाकडे नसल्याचे नार्वेकरांनी निकाल देताना म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आलेला नाही,” असे नार्वेकरांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंना पहिला धक्का-
2018 सालची घटना राहुल नार्वेकरांना अमान्य, 1999 सालची घटनाच वैध.
- खरी शिवसेना कुणाची यावर निकालाचे वाचन सुरु –
दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुखांवरुन मतमतांतरे. घटना, नेतृत्व आणि विधीमंडळ बहुमत हे घटक पक्ष ठरवताना महत्त्वाचे.
निवडणूक आयोग, पक्षाची घटना लक्षात घेऊन निकाल. - 2018 च्या शिवसेना घटनेनुसार हा निकाल दिला जात आहे. दोन्ही पक्षांना या पक्ष घटनेची माहिती आहे. यात निवडणूक आयोगाच्या निकालाचा सुद्धा आधार घेणार आहे.
- दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुखांवरुन मतमतांतरे. घटना, नेतृत्व आणि विधीमंडळ बहुमत हे घटक पक्ष ठरवताना महत्त्वाचे.
- 1999 मध्ये शिवसेनेची घटना लिहिली होती. ती निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली. 2018 ची पक्ष घटना निवडणूक आयोगाकडे नोंदवण्यात आली नाही.
- 2018ला पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळं 2018ची नेतृत्व रचना मान्य करता येणार नाही. – नार्वेकर
- दोन्ही गटाचा शिवसेना पक्षावर दावा, पक्षाचा प्रमुख कोण एवढंच ठरवणार. – नार्वेकर
ठाकरे गटाला पहिला धक्का – पक्ष प्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च
23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवले. तसेच “21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आले. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे.” – नार्वेकर
“22 जून 2022 रोजी विधानसभा अध्यक्ष या नात्याने माझ्यासमोर आलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत, शिवसेना कुणाची? याचं उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्त्वाच्या निवड पद्धतीवर अवलंबून आहे. 2018 मधील नेतृत्व निवड ही पक्षाच्या घटनेला धरून होती, हे प्रमाण मानायची का? असाही सवाल होता. पक्षप्रमुख की राष्ट्रीय कार्यकारणी प्रमुख महत्त्वाचा मानायचा हा कळीचा मुद्दा होता.” असे विधानसभा अध्यक्षांनी नमूद केले.
पक्ष प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला थेट पदावरून काढण्याचा अधिकार नाही – नार्वेकर
“ठाकरे गटानं युक्तिवाद केल्याप्रमाणे पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय मानला जायला हवा. पण त्यासंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे हे मान्य करण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे हा मुद्दा अमान्य केला जात आहे. त्यामुळे पक्षातून किंवा पदावरून कुणाला काढण्यासंदर्भातले पक्षप्रमुखांना असणारे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसारच त्यांनी घ्यायला हवेत, असं शिवसेनेच्या पक्ष घटनेत नमूद केलं आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदावरून काढण्याचा अधिकार नाही.” – राहुल नार्वेकर
शिंदे गटाला मुळ पक्ष म्हणून मान्यता –
एकनाथ शिंदे गटाला अधिकाधिक मेजॉरिटी आहे. त्यामुळे शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना असल्याला मान्यता. मुळ पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता.
गोगावले यांचा व्हिप मान्य –
शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असून भरत गोगावलेंचा व्हिप योग्य, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत. शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
शिंदे गटाचे पात्र 16 आमदारांची यादी –
एकनाथ शिंदे
अब्दुल सत्तार
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
तानाजी सावंत
यामिनी जाधव
चिमणराव पाटील
भरत गोगावले
लता सोनावणे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
अनिल बाबर
महेश शिंदे
संजय रायमुलकर
रमेश बोरनारे
बालाजी कल्याणकर
राहुल नार्वेकरांचा अंतिम निकाल –
1. शिंदे गट खरी शिवसेना आहे.
2. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.
3. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.
4. ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.
5. सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.
( Rahul Narvekar Final Verdict on Shiv Sena MLA Disqualification Maharashtra Live Breaking News )
अधिक वाचा –
– एक हात मदतीचा! मोरया प्रतिष्ठानकडून दिव्यांग बांधवांना व्हील चेअर प्रदान । Vadgaon Maval
– Breaking! कामशेतजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी वाटसरूचा मृत्यू । Kamshet Accident
– आनंदाची बातमी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेची सर्वोच्च कामगिरी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव । Lonavala