मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव मावळ शहरातील चव्हाणनगर येथील एका कुटुंबातील 40 वर्षीय बांधवाला अचानक उद्भवलेल्या आजारामुळे चालणेही शक्य होत नसल्याने, तसेच दत्तनगरी परिसरातील एका कुटुंबातील 83 वर्षीय दिव्यांग जेष्ठ नागरिकाला मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन व्हिलचेअर प्रदान केली. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील गरजू नागरिकांसाठी जनसंपर्क कार्यालयात मोरया जनआरोग्य सेवा मदत कक्षाची स्थापना केली आहे. त्याद्वारे शहरातील गरजू नागरिकांना विविध आजारांवर मार्गदर्शन व अत्यावश्यक उपचारासाठी वैयक्तिक पातळीवर सहकार्य केले जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत वडगावमधील सुमारे तीनशेहून अधिक रुग्णांवर ह्दयातील छिद्र, कॅन्सर, मणका, मोतीबिंदू, कान, नाक, घसा, हात , पाय, जीभ, वाहन अपघात अशा अनेक आजारांवरील छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया पुणे, मुंबई, पिपंरी, चिंचवड, वडगाव येथील विविध हाॅस्पिटल मध्ये अतिशय अल्पदरात तसेच अगदी मोफतही पार पडल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या आरोग्य शिबीरातून दिव्यांग बांधवांना विशेष सहकार्य विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप केले जाते. ( wheelchairs to disabled from Morya Pratishthan Vadgaon Maval )
सर्वसामान्य जनतेच्या मनात मोरया प्रतिष्ठान ने निर्माण केलेले आपुलकीचे स्थान कधीही कमी पडू न देता पुढील काळात देखील माणुसकीचा हा धागा कधीच सुटणार नाही, असा विश्वास देऊन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी या दोनही कुटुंबाना आश्वासित केले. यावेळी मोरया जन आरोग्य सेवा मदत कक्ष प्रमुख सुरेखा गुरव, यशवंत शिंदे, प्रसाद साबळे आणि या दोनही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade
– ‘व्हर्टिव्ह’तर्फे चाकण भागात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन! उद्योगाप्रती वचनबद्धता मजबूत करत ‘मेक इन इंडिया’ अभियानाला समर्थन
– भटके-विमुक्त समाजासाठी शासनाचा पुढाकार; शिधापत्रिका वितरणासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत विशेष मोहिम