पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरुन ते 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बुधवारी (दि. 10 जानेवारी) सह्याद्री अतिथीगृह, मुंबई इथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. सदर बैठकीत इतरही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. ( Maharashtra Govt Pandit Deendayal Upadhyaya Gharkul Land Purchase Financial Assistance Scheme )
तथापी, या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतू, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.
परंतू, राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान 1 लाख रुपये करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 10) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
अधिक वाचा –
– महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा ब्लॉक, पाहा कुठे आणि किती कालावधीसाठी असेल ट्राफिक ब्लॉक । Mumbai Pune Expressway
– पुणे-लोणावळा दरम्यान सोमवारपासून दुपारच्या वेळेत लोकल धावणार, रेल्वे बोर्डाचा निर्णय; खासदार बारणेंची माहिती
– उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना’ – राहुल नार्वेकर यांचा अंतिम निकाल । Shiv Sena MLA Disqualification Case