महाराष्ट्र राज्यातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या, तर 130 थेट जनतेतून सरपंचांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूकांची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 3 ऑक्टोबर) रोजी केली. यात पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी मावळ तालुक्यातील वाकसई ही ग्रामपंचायत वगळून मावळ तालुक्यातील एकूण 29 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर 06 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. ( Maharashtra Gram Panchayat Election 2023 General And By-Election Program Of 29 Villages In Maval Taluka Pune )
मावळ तालुक्यातील 29 गावांपैकी सार्वत्रिक निवडणूका असलेली गावे ही 19 आहेत. तर, पोटनिवडणूका असलेली गावे ही 10 आहेत.
- सार्वत्रिक निवडणूका असलेली गावे – 19
- जांबवडे
- सदुंबरे
- सुदवडी
- साळुंब्रे
- बेबडओहोळ
- लोहगड
- शिळींब
- कोंडीवडे (आं.मा.)
- कल्हाट
- आंबळे
- भाजे
- सांगिसे
- मुंढावरे
- उदेवाडी
- मळवंडी ढोरे
- दिवड
- ओवळे
- डोणे
- आढले बुद्रुक
पोटनिवडणूका असलेली गावे – 10
- चिखलसे
- शिवणे
- नवलाख उंब्रे
- कुसगाव बुद्रुक
- पुसाणे
- शिरगाव
- दारुंब्रे
- तुंग
- खांडशी
- कान्हे.
मावळ तालुक्यातील या गावांच्या सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका वाचा…
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार याची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ह्यातील पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निकालांची अधिक सुचना प्रसिद्ध करतील, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– डीजेच्या लेझर लाईटमुळे तरूणाच्या डोळ्याची दृष्टी अधू; पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतील घटना
– ‘जे घरात बसलेत त्यांनी शहरवासीयांना उत्तर द्यावं’, तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांवरुन ‘आण्णांचा’ ‘आप्पांवर’ हल्लाबोल
– तिकोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील तुपे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election