व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोशी येथे देशातील सर्वात मोठ्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल - देवेंद्र फडणवीस Maharashtra MSME Defense Expo inaugurated by DCM Devendra Fadnavis at Moshi near Pune.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 25, 2024
in महाराष्ट्र, पुणे, शहर
Maharashtra-MSME-Defense-Expo

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले.जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल विभास पांडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, महेश शिंदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, निबे लि. चे गणेश निबे आदी उपस्थित होते. (Maharashtra MSME Defense Expo inaugurated by DCM Devendra Fadnavis at Moshi near Pune)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 2017 मध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केले आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी 1 हजार कोटीचा निधी तयार करण्यात आला. त्यातून 600 एमएसएमई तयार झाल्या आहेत. केवळ 300 कोटीतून 12 ते 15 हजार कोटींचे मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केले. आज जगातले सगळे देश संरक्षण क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईसाठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. रोजगार निर्मितीसोबत चांगली शस्त्रास्त्रे राज्यात तयार होतील याचेही प्रयत्न करू, असे फडणवीस म्हणाले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’हे अतिशय भव्य प्रदर्शन असून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आहे. संरक्षण उद्योग हा देशात नव्याने विकसित होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात उद्योगांची गरज ओळखून अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर देण्यात आला’ असे त्यांनी सांगितले.

‘एमएसएमई’ने संरक्षण क्षेत्रात चांगला ठसा उमटवला आहे. राज्यात आधुनिक शस्त्रास्त्रे, वायुसेनेसाठी हेलिकॉप्टर तयार करण्यात येते. त्यामुळे या उत्पादनांच्या किंमती कमी होत आहेत. देशाच्या सुरक्षेला बळ देण्याचे काम MSME करीत असून भविष्यात महाराष्ट्र डिफेन्सचा हब बनेल यादृष्टीने उद्योग विभागाचे प्रयत्न आहेत’ असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा –
– वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; ‘मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू’ – आमदार सुनिल शेळके
– ‘पोक्सो’ कायदा आणि ‘निर्भया’ योजनेबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांना वडगाव मावळ येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून सखोल मार्गदर्शन
– मनोज जरांगेंच्या आवाहनाला मावळ तालुक्यात मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; आंदोलकांनी थेट जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला । Maratha Samaj Rasta Roko Andolan


Previous Post

स्तुत्य उपक्रम! रोटरी क्लबच्या माध्यमातून दोन शाळांमध्ये बांधले जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृह, भूमिपूजन संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
manoj-jarange-LATEST-News

सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.