मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा क्षेत्रात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मावळ तालुक्यातील मनसेचे सर्व अंगीकृत संघटना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या यांची संयुक्त आढावा बैठक वडगाव मावळ येथील मावळगड जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रणजीत दादा शिरोळे (सरचिटणीस मनसे), अमेय खोपकर (सरचिटणीस मनसे), बंऐश्री सचिन चिखले (शहराध्यक्ष/गटनेते) आदी पदाधिकारी उपस्थित होते. ( Maharashtra Navnirman Sena MNS Party will contest Maval Lok Sabha constituencies )
मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या नियोजनानुसार पार पडलेल्या आढावा बैठकीत मनसे पक्षसंघटना बांधणी आणि विस्तार तसेच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे रोखठोक विचार व पक्षाची ध्येयधोरणे मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत आणि नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना करण्यात आल्या. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने आपल्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवून आगामी लोकसभा आणि ग्रामपंचायत निवडणूक पुर्ण ताकदीने लढण्यासाठी सज्ज व्हावे, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘घर चलो अभियान’, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मावळ लोकसभा दौऱ्यावर, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी साधणार संवाद
– तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप
– शिवसेना ठाकरे गटाकडून वडगाव शहरात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम