राज्यभरात इयत्ता दहावीच्या परीक्षेला (SSC Board Exams 2024) आजपासुन (दि. 1 मार्च) सुरवात होणार असून पवनानगर (ता. मावळ) केंद्रातही दहावीच्या परीक्षेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहीती केंद्रसंचालक व प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली. पवनमावळ परिसरातील पवना विद्या मंदिर, पवनानगर केंद्रामध्ये पवना विद्या मंदिर, वारु-कोथुर्णे विद्यालय कोथुर्णे, भैरवनाथ विद्यालय बौर, संत तुकाराम विद्यालय शिवणे, संत ज्ञानेश्वर विद्यालय दिवड, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली, माध्यमिक विद्यालय करुंज, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय जवण-अजिवली या शाळेतील विद्यार्थी या शाळांमधील एकूण 417 विध्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. ( Maharashtra SSC Board Exam 2024 10th Board exam )
यामध्ये परीक्षा ‘कॉपी मुक्त अभियाना ‘साठी व परिक्षा शांततेत पार पाडण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन दक्षता समितीचे सदस्यही मदत करत आहेत. तसेच केंद्र कॉफी मुक्त होण्यासाठी संपूर्ण ब्लॉक मध्ये सी. सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावेळी नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केंद्रातील सर्व विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
ही परीक्षा व्यवस्थीत पार पडावी व विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी परीक्षा केंद्रसंचालक भाऊसाहेब आगळमे, उपकेंद्र संचालक अर्चना शेडगे प्रमुख व परीक्षा विभाग प्रमुख भारत काळे, सहाय्यक गणेश ठोंबरे विशेष प्रयत्न करत आहेत. यावेळी बोलताना भाऊसाहेब आगळमे म्हणाले की, केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. बसवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भयमूक्त वातावरण सामोरे जातील.
राज्यात 9 विभाग मंडळात परीक्षा –
राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला 1 मार्च म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी एकूण 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती पुणे बोर्डाकडून देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी वितरित । PM Kisan Yojana
– स्वीडनहून थेट मावळात..! शिळींब गावात आले परदेशी पाहुणे, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत । Maval News
– मावळमधील डोंगरी भागातील शेतकऱ्यांना शेळीपालन विषयी प्रशिक्षण; शिबिरार्थी 554 शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप । Maval News