महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ( Maharashtra State Examination Council Pune ) मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा ( Scholarship Exam ) अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल 29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्याअनुषंगाने 29 एप्रिल 2023 ते 9 मे 2023 या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे. ( Maharashtra State Examination Council Pune Final Result Merit List of Class Fifth And Eighth Scholarship Exam Announced )
या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून बघता येणार आहे. तसेच शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे बघता येणार आहे. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) बघता येणार आहे.
हेही वाचा – बालविवाह प्रकरणी पतीला अटक, मावळमधील धक्कादायक घटना! अल्पवयीन पत्नी 5 महिन्यांची गरोदर झाल्यानंतर प्रकार उघड
संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीची लिंक पुढीलप्रमाणे आहेत. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी), गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय) शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय,तालुकानिहाय) विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना लिंकवर क्लिक करून माहिती डाऊनलोड करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक; लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई
– देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यात मृत्यू! बंद घरात आढळला मृतदेह
– मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या ‘शिरगाव सरपंच हत्या’ प्रकरणी मोठी अपडेट! ‘त्या’ तीनही आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता