Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. राज्यात जवळपास महिनाभर चाललेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा शेवट 23 नोव्हेंबर रोजी निकालाने झाला आणि 288 आमदार निवडून विधानसभेवर गेलेत. सोबत 5 डिसेंबर रोजी राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाही शपथविधी झाला.
परंतु मंडळी, तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराचा पगार किती असतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आमदारांना फक्त पगारच नाही तर इतरही अनेक भत्ते मिळत असतात. तसेच एकदा निवडून आले आणि 5 वर्ष काम केले तरी आमदाराला आयुष्यभरासाठी पेन्शनही सुरू होते. चला तर मग, पाहुयात.. आमदारांना किती पगार मिळतो ते.
- महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहातील सदस्यांना अर्थात आमदारांना सारखेच वेतन आहे. सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. यात मूळ वेतन आणि महागाई आणि इतर भत्ते एकत्र करून हा पगार दिला जातो. सरकारच्या प्रधान सचिवालयाकडून हा पगार देण्यात येतो.
प्राप्त माहितीनुसार, विधिमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो. शिवाय, इतरही अनेक सोयी सुविधा आमदारांना दिल्या जातात. आमदारांना काही सुविधांसाठी भत्ता सुद्धा मंजूर केला जातो. त्यानुसार, टेलिफोन 8 हजार रुपये भत्ता, स्टेशनरी 10 हजार रुपये भत्ता, संगणक 10 हजार रुपये भत्ता दिला जातो. त्यामुळे एका आमदाराला महिन्याला साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये एका आमदाराला भत्ता किंवा पगार मिळतो.
याव्यतिरिक्त अधिवेशनादरम्यान प्रत्येक आमदाराला दर दिवशी काही विशिष्ट रक्कम भत्ता म्हणून दिली जाते. यानुसार प्रत्येक आमदाराला दरदिवशी 2 हजार रुपये भत्ता मिळतो. तर आमदारांच्या पीएच्या पगारासाठी 25 हजार रुपये मंजूर झालेले आहेत.
राज्यांतर्गत प्रवासासाठी दर वर्षाला 15 हजार रुपये मिळतात. तसेच महाराष्ट्राबाहेर जायचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र 15 हजार रुपये मिळतात. तर आमदार विमानतळाहून राज्यांतर्गत 32 वेळा आणि देशांतर्गत 8 वेळा प्रवास करू शकतात. तर बेस्ट, एमएसआरटीसी आणि एमटीडीसी मध्ये मोफत प्रवासाची सुविधा.
आमदारांचा पगार किती?
मूळ पगार 67,000
दूरध्वनी 8000
स्टेशनरी 8000
संगणक चालक 10,000
खाजगी सहायक 25,000
ड्रायव्हर 15,000
अधिवेशन काळात प्रतिदिन 2000महागाई भत्ता धरुन 3 लाखाच्या आसपास पगार एका आमदाराला मिळतोय.
शिवाय सध्या मुंबईत सरकारी घरे आमदारांना उपलब्ध नसल्यामुळे लाखो रूपये…
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) December 7, 2024
आमदारांना कोणत्या सुविधा मिळतात?
पगाराव्यतिरिक्त आमदाराला अनेक प्रकारचे भत्ते आणि सुविधा मिळतात. आमदाराला त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील लोककल्याणकारी कामांवर खर्च करण्यासाठी वेगळा आमदार निधी मिळतो.
यासह आमदाराला त्यांच्या राज्याच्या राजधानीत राहण्याची सोय, दैनंदिन भत्ता, प्रवास भत्ता, विशेष सुविधा आणि रेल्वे आणि राज्य सरकारी बसने प्रवास करताना प्राधान्य, वाहतूक भत्ता इ. याशिवाय त्याला पर्सनल सेक्रेटरी किंवा त्याचा खर्च आणि वैद्यकीय सुविधाही मिळते.
आमदार निधी वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो.
नियोजन विभागाकडे आमदार कामे सुचवत असतात आणि जिल्हा नियोजन विभागाची मंजुरी यातील महत्वाचा टप्पा असतो.
कामे कोणाला (कोणत्या कंत्राटदारांना) द्यायची हे आमदार स्वतः ठरवतात.
पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे,…
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) December 8, 2024
आमदारांना मिळणारी पेन्शन
विधानसभा किंवा विधान परिषदेवर एकदा निवड झाली तरी आमदार पेन्शन घेण्यास पात्र ठरतात. आमदारांना दरमहा 50 हजार रूपये निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या आमदारांची सेवा 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी झाली आहे, त्यांना त्यांच्या प्रत्येक टर्मसाठी अतिरीक्त 2 हजार रूपये निवृत्ती वेतन दिले जाते.
विधीमंडळाच्या सदस्याचा मृत्यू झाल्यास. त्याची पत्नीला किंवा पतीला दरमहा 40 हजार रूपये कुटुंब वेतन देण्यात येते. शिवाय त्या पत्नीचा किंवा पतीचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या मुलांनाही पेन्शन लागू होते.
(माहिती – इंटरनेट साभार)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ