मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठान ( Morya Mahila Pratishthan Vadgaon Maval ) यांच्याकडून भव्य पाककला सुगरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सुनिल शेळके यांचा 20 ऑक्टोबर हा वाढदिवस आहे. त्यानिमित्त खास वडगाव शहरातील ( Vadgaon City ) महिला भगिनींसाठी मोरया महिला प्रतिष्ठान ही अनोखी स्पर्धा घेऊन येत आहे. ( Mahasugaran of Vadgaon 2022 Grand Cooking Competition On Occasion of MLA Sunil Shelke Birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोण होणार वडगावची महासुगरण 2022 ( Who Will Be The Mahasugaran of Vadgaon 2022 )
या स्पर्धेद्वारे मोरया महिला प्रतिष्ठान महिलांच्या पाककलेला भव्य व्यासपीठ मिळवून देणार आहे. स्पर्धेसाठी तीन पदार्थांचे विषय असणार आहेत. युवा उद्योजक अतुल खंडुजी वायकर यांजकडून एकूण 54000 रुपये रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे.
विषय खालील प्रमाणे;
1) मक्यापासून पदार्थ बनवणे
प्रथम क्रमांक – 10,000 रुपये
द्वितीय क्रमांक – 5000 रुपये
तृतीय क्रमांक – 3000 रुपये
2) पराठा बनवणे
प्रथम क्रमांक – 10,000 रुपये
द्वितीय क्रमांक – 5000 रुपये
तृतीय क्रमांक – 3000 रुपये
3) पॅटीस बनवणे
प्रथम क्रमांक – 10,000 रुपये
द्वितीय क्रमांक – 5000 रुपये
तृतीय क्रमांक – 3000 रुपये
यासह सर्व सहभागी स्पर्धकांना रिटर्न गिफ्ट आणि सर्टीफिकेट मिळणार आहेत. यासह महत्वाची बाब म्हणजे खास फक्त स्पर्धकांसाठी स्पर्धेच्या ठिकाणी लकी ड्राॅ देखील काढला जाणार आहे.
प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांची मेजवानी;
या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा भव्य लकी ड्राॅ कुपण काढले जाणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी छान ड्रेपरी करून येणे बेस्ट ड्रेपरीसाठी सरप्राईज बक्षिस दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे;
ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी नावनोंदणीसाठी नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीएसएनएल ऑफिस शेजारी, वडगाव मावळ येथे संपर्क साधायचा आहे. तसेच स्पर्धेसाठी नावनोंदणी मर्यादित असणार आहे.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क – 8983878722 / 9822838823
स्पर्धेचा दिनांक, वेळ, स्ठळ जाणून घ्या…
स्पर्धा दिनांक – शनिवार 08 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत
स्पर्धा स्थळ – भेगडे लाॅन्स, जुना पुणे-मुंबई हायवे, वडगाव मावळ
विशेष सहकार्य – मोरया ढोल पथक, हॉटेल शिवराज ग्रुप, मोरया मित्र मंडळ
आयोजक – मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव मावळ
टीप – या स्पर्धेचे सर्व हक्क मोरया महिला प्रतिष्ठानकडे असणार आहेत.
( Mahasugaran of Vadgaon 2022 Grand Cooking Competition On Occasion of MLA Sunil Shelke Birthday )
अधिक वाचा –
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा, जाणून घ्या स्पर्धेबद्दल सर्वकाही I MLA Sunil Shelke Birthday
‘कुलदेवतेच्या साक्षीने सांगतो गहुंजेची पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून घेतली’ – आमदार सुनिल शेळके