राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) आणि स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ( Lal Bahadur Shastri ) यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड रेल्वे स्टेशन ( Dehu Road Railway Station ) येथे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभाग आणि देहूरोड स्टेशन कर्मचारी वर्ग, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी यांच्या संयुक्तवतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काँग्रेस सचिन साठे हे उपस्थित होते. यावेळी साठे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी देहू रोड रेल्वे स्टेशन परिसरात देशी झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये अर्जुन, करंज, घेवडा, बकुळ, बांबू , सीता, अशोक, कडुनिंब, कांचन या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ( Plantation Of Native Trees In Dehu Road Railway Station Area )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतालाच नव्हे तर, संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांचे अनुयायी फक्त भारतात नव्हे, तर जगात सर्वत्र आहेत. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, बराक ओबामा हे नेते देखील महात्मा गांधी यांच्या विचारांचे अनुयायी आहेत. महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’चा नारा दिला. त्यानंतर देशभरातील जनता स्वातंत्र्यलढ्यात उतरली आणि ब्रिटिशांना भारत देश सोडावा लागला.” ( Mahatma Gandhi Jayanti )
तसेच, “साधी राहणी व उच्च विचारसरणी असणाऱ्या स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देखील आपल्या आचार विचारातून आदर्श जगापुढे ठेवला आहे. त्यांनी दिलेला जय जवान जय किसान चा नारा पुढे हजारो वर्ष देशाला उपयोगी आहे. देशात अन्न देणारा आणि संरक्षण करणारा सक्षम असेल तरच देशातील नागरिक सुरक्षित राहतील.” या महान नेत्यांच्या जयंती दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काँग्रेस सचिन साठे यांनी केले. ( Lal Bahadur Shastri Jayanti )
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस विभाग पर्यावरण अध्यक्ष अक्षय शहरकर, देहू रेल्वे स्टेशन प्रबंधक रतन रजक, लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डीचे अध्यक्ष अनिल भांगडिया, लिओ क्लब ऑफ आकुर्डी युथचे हरशीत शर्मा, व्यंकटेश दळवी, हाजी मलंग, गफूर शेख, व्यंकटेश कोळी, विरेन रामनारायण, अमर नाणेकर, देविदास जाधव, रमेश मुरुगकर, इंद्रजीत गोरे, मंगेश मोरे, प्रकाश पवार, मनोज ढकोलिया, देवानंद ढगे, सिद्धांत रिकीबे, कृष्णा चिकटे, अनिल कदम, सचिन धावरे, अनिकेत इंगोले, सुनील ओटले, विशाल म्हेत्रे, सचिन कांबळे, मयूर रिकिबे, अमोल तेलगे, बालाजी सुरवसे, विठ्ठल झोडगे, हिरामण गवई, राजेश शर्मा, वसंतकुमार गुजर, दर्शिता श्रीपाद, अमोल परदेशी, धरमचंद प्रजापती, लतीका पटेल आदी यावेळी उपस्थित होते. ( Mahatma Gandhi And Lal Bahadur Shastri Jayanti Plantation Of Native Trees In Dehu Road Railway Station Area )
अधिक वाचा –
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआर महाविद्यालयाचे घवघवित यश I Pimpri Chinchwad
‘बँकेचे ग्राहक हेच बँकेचे मालक’, पवना सहकारी बँकेच्या वर्धापनदिनी नवीन मुख्य कार्यालय इमारतीचे उद्घाटन