व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर महिलांच्या घोळक्याला भरधाव वाहनाची धडक, 5 महिला ठार

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळ पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी (दिनांक 13 फेब्रुवारी) रात्री झालेल्या गंभीर अपघातात एकूण 5 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 14, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Accident

File Photo : Accident Image


पुणे जिल्ह्यात ( Pune News ) एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळ पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी (दिनांक 13 फेब्रुवारी) रात्री झालेल्या गंभीर अपघातात एकूण 5 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य 13 महिला जखमी आहेत. राजगुरुनगर जवळील शिरोली (तालुका खेड) परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. ( Major Accident On Pune Nashik Highway Near Rajgurunagar Car Heat And Run 5 Women Dead 13 Injured )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नेमके काय घडले?

प्राप्त माहितीनुसार, सर्व महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून एका मंगल कार्यालयात जेवण बनवण्यासाठी निघाल्या होत्या. पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा इथे उतरून त्या शिरोली इथे निघाल्या होत्या. तेव्हा साधारण रात्री 11 च्या सुमारास पुणे-नाशिक हायवे ओलांडत असताना एका भरधाव कारने या महिलांना उडवले. अक्षरशः काही महिला यात चिरडल्या गेल्या. अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तसेच 13 महिला जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून खेड पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गरीब कुटुंबातील महिलांचा झालेला मृत्यू घरातील मायेचा हात हरपल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( Major Accident On Pune Nashik Highway Near Rajgurunagar Car Heat And Run 5 Women Dead 13 Injured )

अधिक वाचा –

– श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर! विविध क्षेत्रातील 20 मान्यवरांचा होणार सन्मान, पाहा पुरस्कार्थ्यांची यादी
– भीषण अपघात! इंजिनाच्या धडकेत 4 रेल्वे कामगार जागीच ठार, महाराष्ट्र हळहळला


Previous Post

खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल; क्रिकेट स्पर्धा ते बैलगाडा शर्यत, वाचा कधी, कुठे काय ते?

Next Post

वडगाव शहरात महाआरोग्य शिबिर संपन्न, हजारो रुग्णांनी घेतला मोफत औषधोपचाराचा लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mahaarogya-Camp-In-Vadgaon-Maval-City

वडगाव शहरात महाआरोग्य शिबिर संपन्न, हजारो रुग्णांनी घेतला मोफत औषधोपचाराचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.