मावळ तालुक्यातील ओझर्डे, कांब्रे आणि साते गावातील बचत गटातील महिलांसाठी सोमवारी (दिनांक 17 एप्रिल 2023) रोजी अगरबत्ती, धूप बनवण्याचे साहित्य वाटप आणि मिरची कांडप युनिटचे उद्घाटन करण्यात आले. सिनेक्रोन टेक्नॉलॉजी आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.
शिवकन्या महिला बचत गट ओझर्डे यांना अगरबत्ती, जागृती महिला बचत गट कांब्रे यांना धूप बनवण्याचे साहित्य वाटप करण्यात आले. तर, मावळ मसाले गटाला मिरची कांडप युनिट वाटप करण्यात आले. ( Major assistance for economic empowerment of women in Ozarde Kambre and Sate villages of Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील महिलांचे सक्षमीकरण करणे, व्यवसायामध्ये महिलांचा समावेश वाढवणे, व्यवसायाच्या माध्यमातून महिलांची समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करणे, तसेच कौटुंबिक निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सदर कार्यक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सिनेक्रोन टेक्नॉलॉजीकडून रफिक नदाफ (असोसिएट डायरेक्टर) सीएसआर विभाग प्रमुख, सैफन मुजावर (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) कायदेशीर सल्लागार, राजेश आगळे (प्रशासकीय व्यवस्थापक), रवी गोळे (सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक) मिस मोआमोऺगला आवो मॅडम, संताजी जाधव – कृषी अधिकारी (पंचायत समिती) गणेश बोऱ्हाडे – ग्रामपंचायत सदस्य साते, हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून अनिल पिसाळ, ओंकार कुलकर्णी, सारिका शिंदे, परमेश्वर कांबळे, पंढरीनाथ बालगुडे, तसेच शालेय विकास समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडी मुख्याध्यापिका, बचत गटातील महिला सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
हॅन्ड इन हॅन्ड संस्थेकडून ओंकार कुलकर्णी यांनी सर्व सिनेक्रोन टेक्नॉलॉजी प्रतिनिधि, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राह्मणवाडी सर्व शिक्षक, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित महिला आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमाला उदंड प्रतिसाद । Vadgaon Maval
– वडगाव भाजपा महिला आघाडीकडून समरसता स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन