छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ, ‘मणिपूरच्या घटनेवर बोलूयात…!’ हे खुले चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्राची सुरुवात ‘हा देश माझा याचे भान जरासे राहुद्या द्या रे…’ या गीताने झाली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्र सेवा दल येथे हा कार्यक्रम पार पडला. ( Manipur violence Open discussion session by Chhatrabharti Participation of various organizations )
एखाद्याबद्दल दहशत निर्माण करताना किंवा वर्चस्व निर्माण करताना नेहमी बाईलाच लक्ष का केले जाते?, याला कारणीभूत कोण – समाज व्यवस्था?, पुरुषीवृत्ती? कि राजकारण? यावर दीर्घ चर्चा झाली. तर, ‘भारतात जिथे एका बाजूला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा सुरु आहे तिथेच दुसऱ्या बाजूला याच देशाच्या बेटिला हा अन्याय सहन करावा लागत आहे. जातीवादाच्या नावाखाली अशी असंविधानिक कृत्ये करणे कितपत योग्य आहे? अशी कृत्ये आपल्या देशात घडणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे…!,’ असे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्सरा आगा (पत्रकार), प्रवीण गुंजाळ (छात्रभारती), अविनाश इंगळे (अंनिस), राहुल सोनवणे (सत्यशोधक बहुजन आघाडी, महाराष्ट्र), रवींद्र लामखेडे (राष्ट्र सेवा दल, पुणे), आदिनाथ जावीर (युवक कॉंग्रेस, पुणे), संदिप सुनंदा (कागज काच पत्र कष्टकरी संघटना), अप्पा अवारसे (युक्रांद), सचिन पांडुळे (युक्रांद), अनिकेत साळवे (विचारवेध), प्रशांत दांडेकर (राष्ट्र सेवा दल), अभिजीत आंब्रे, अकबर शेख, स्मिता निकलसे (जनता दल युनायटेड), माधवी गायकवाड, दत्ता पाकिरे (जनता दल सेक्युलर), राहुल ससाने (दलित पँथर), तुकाराम शिंदे (विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती), ओंकार मोरे (अभ्यासिका विद्यार्थी समिती), अभिजीत पोखनिकर (दादाची शाळा), ओंकार ब्राम्हणे, अमोल शिंदे (दादाची शाळा), सोमनाथ चव्हाण, फैयाज इनामदार (राष्ट्र सेवा दल), आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष तुकाराम डोईफोडे, राज्य सचिव छाया काविरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, संघटक सौरव शिंपी, संघटीका दिव्या कांबळे, सदस्य अजय कांबळे, वैष्णवी कोळी, वैभव रंधे, प्रियंका ढगे, अभिलाषा दूधपचारे यांनी केले. ( Manipur violence Open discussion session by Chhatrabharti Participation of various organizations )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या..! परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन, वाचा सविस्तर
– प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या ‘या’ योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या…
– शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे