व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मणिपूरच्या घटनेवर बोलूयात…!’ छात्रभारतीतर्फे खुले चर्चासत्र, विविध समविचारी संघटनांचा सहभाग

छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ, 'मणिपूरच्या घटनेवर बोलूयात...!' हे खुले चर्चासत्र आयोजित केले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2023
in देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, शहर
Manipur-violence

Photo Courtesy : Team Dainik Maval


छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ, ‘मणिपूरच्या घटनेवर बोलूयात…!’ हे खुले चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्राची सुरुवात ‘हा देश माझा याचे भान जरासे राहुद्या द्या रे…’ या गीताने झाली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्र सेवा दल येथे हा कार्यक्रम पार पडला. ( Manipur violence Open discussion session by Chhatrabharti Participation of various organizations )

एखाद्याबद्‌दल दहशत निर्माण करताना किंवा वर्चस्व निर्माण करताना नेहमी बाईलाच लक्ष का केले जाते?, याला कारणीभूत कोण – समाज व्यवस्था?, पुरुषीवृत्ती? कि राजकारण? यावर दीर्घ चर्चा झाली. तर, ‘भारतात जिथे एका बाजूला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा सुरु आहे तिथेच दुसऱ्या बाजूला याच देशाच्या बेटिला हा अन्याय सहन करावा लागत आहे. जातीवादाच्या नावाखाली अशी असंविधानिक कृत्ये करणे कितपत योग्य आहे? अशी कृत्ये आपल्या देशात घडणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे…!,’ असे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्र सेवा दल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्सरा आगा (पत्रकार), प्रवीण गुंजाळ (छात्रभारती), अविनाश इंगळे (अंनिस), राहुल सोनवणे (सत्यशोधक बहुजन आघाडी, महाराष्ट्र), रवींद्र लामखेडे (राष्ट्र सेवा दल, पुणे), आदिनाथ जावीर (युवक कॉंग्रेस, पुणे), संदिप सुनंदा (कागज काच पत्र कष्टकरी संघटना), अप्पा अवारसे (युक्रांद), सचिन पांडुळे (युक्रांद), अनिकेत साळवे (विचारवेध), प्रशांत दांडेकर (राष्ट्र सेवा दल), अभिजीत आंब्रे, अकबर शेख, स्मिता निकलसे (जनता दल युनायटेड), माधवी गायकवाड, दत्ता पाकिरे (जनता दल सेक्युलर), राहुल ससाने (दलित पँथर), तुकाराम शिंदे (विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती), ओंकार मोरे (अभ्यासिका विद्यार्थी समिती), अभिजीत पोखनिकर (दादाची शाळा), ओंकार ब्राम्हणे, अमोल शिंदे (दादाची शाळा), सोमनाथ चव्हाण, फैयाज इनामदार (राष्ट्र सेवा दल), आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष तुकाराम डोईफोडे, राज्य सचिव छाया काविरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, संघटक सौरव शिंपी, संघटीका दिव्या कांबळे, सदस्य अजय कांबळे, वैष्णवी कोळी, वैभव रंधे, प्रियंका ढगे, अभिलाषा दूधपचारे यांनी केले. ( Manipur violence Open discussion session by Chhatrabharti Participation of various organizations )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या..! परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन, वाचा सविस्तर
– प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या ‘या’ योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या…
– शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे


Previous Post

‘परमपथ चातुर्मास 2023 – चलो पाठशाला’ : लहान मुले समाजाचे भविष्य – गुरुदेव पियुष विजयजी महाराज

Next Post

मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मावळ बिरसा ब्रिगेड संघटनेकडून तीव्र निषेध

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Manipur-violence

मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मावळ बिरसा ब्रिगेड संघटनेकडून तीव्र निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.