Dainik Maval News : मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पैसाफंड प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
या परीक्षेत इयत्ता दुसरीच्या वर्गातील कु. ईश्वरी अरविंद गुरव या विदयार्थीनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केला तर पुणे विभागात जिल्हास्तरीय यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच कु. दिशा तुषार पाटील या विद्यार्थिनीने राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
तर प्रियश शरद फडतरे या विद्यार्थ्याने राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत नववा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु. गौरी सुशील चव्हाण या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक तसेच पुणे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका पल्लवी जगताप व इयत्ता पहिली च्या वर्ग शिक्षिका आशा लबडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
- या चारही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा रोवला आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे , सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के,संस्थेचे ज्येष्ठ संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा शालेय समिती अध्यक्ष विनायकजी अभ्यंकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गुणवत्ता धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे कंसात मिळविलेले गुण
इयत्ता दुसरी
१) ईश्वरी अरविंद गुरव – १४२ /१५०
(राज्यात पाचवा व जिल्ह्यात प्रथम)
२)दिशा तुषार पाटील १३८/१५०
(राज्यात -सातवा व जिल्ह्यात – दुसरा)
३) प्रियश शरद फडतरे -१३४/ १५०
(राज्यात -नववा व जिल्ह्यात – चौथा)
इयत्ता पहिली
४) गौरी सुशील चव्हाण- १३६/१५०
(राज्यात- आठवा व जिल्ह्यात – तिसरा)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates