इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या शिरपेचात अनेक मानाचे पुरस्कार खोवले गेले आहे. 2023-24 या इनर व्हील क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात आणि सचिव निशा पवार यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्षा आणि सर्वोत्तम सचिव अवॉर्ड प्रदान करण्यात आले. पनवेल येथील झालेल्या डिस्ट्रिक्ट 313 च्या सभेत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सोबतच पवन मावळ विभागातील तीन शाळांना आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्यात आल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. सशक्त महिला मजबूत जग, पर्यावरण संरक्षण, दिव्यांगाना मदत, आरोग्य आणि स्वच्छ्ता, युवा विकास कार्यक्रम, विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक स्तरावर सक्षम करणे, एक सदस्य एक प्रकल्प, इनरव्हील क्लबचे ब्रॅण्डिंग करणे तसेच जिल्हा पातळीवर घेण्यात आलेली ऑनलाईन लिंपन कला कार्यशाळा या व अनेक उपक्रमांकरिता भरघोस बक्षिसांनी गौरविण्यात आले. ( Many awards to Inner Wheel Club of Talegaon Dabhade for brilliant performance )
रचना मालपाणी आणि सुनिता जैन यांच्या हस्ते पनवेल येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान कऱण्यात आले. संध्या थोरात यांच्या अध्यक्षतेखाली चार प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर तर दहा प्रकल्प असोसिएशन साठी निवडले गेले होते. यावेळी संध्या थोरात, रश्मी थोरात, आरती भोसले आणि वैभवी कारके उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– सतर्क राहा ! लोणावळ्यात विक्रमी पाऊस, 24 तासापासून बरसतोय मुसळधार पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
– ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ; लोणावळा शहराजवळील घटना । Lonavala Crime News
– मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग