Dainik Maval News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथील राज्यातील पहिल्या सौरग्राम ठरलेल्या मान्याचीवाडी (ता. पाटण) ‘सौर ग्राम’ प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मान्याचीवाडी गावचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीजग्राहकांचे वीज बिलदेखील शून्यवत होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ( Manyachiwadi village in Satara district has become the first solar village project in Maharashtra )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागेल त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के रक्कम तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
अधिक वाचा –
– स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रोटरी सिटीच्या माध्यमातून रक्षाबंधन सण साजरा । Maval News
– येळसे येथील प्राथमिक शाळेत मावळ तालुक्यातील पहिला स्किल स्कूल शाळा प्रकल्प सुरू । Pavananagar News
– लोणावळ्यासह मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे : आयपीएस सत्यसाई कार्तिक । Lonavala News