व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या’ – रामदास कदम

न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 29, 2023
in पुणे, महाराष्ट्र, शहर
Ramdas-Kadam-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, ज्याचे पोट खाली आहे, जो गरीब आहे त्याला आरक्षण द्या. जातीवर आधारीत आरक्षण देऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकले असते तर आज कुणबी मराठा ओबीसी मराठा धनगर समाज हे रस्त्यावर आले नसते. परंतु राज्यकर्त्यांनी त्यावेळी ऐकले नाही. बाळासाहेबांच्या विचारांची जर पूर्वीच अंमलबजावणी झाली असती तर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाली नसती, असे मत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार रामदास कदम यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. ( Maratha Reservation Ramdas Kadam Pune )

  • सन्मान सोहळ्यात कष्टक-यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार विद्याधर अनास्कर आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी असे पुरस्कारांचे स्वरुप होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या ‘क्रांतिवीर’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशनही झाले. तसेच संस्थेच्या कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर एज्युकेशनल कॅम्पस, धायरी पुणे ४१ या नवीन कॅम्पसचे भूमीपूजन झाले.

रामदास कदम म्हणाले, आजचे राजकारण अतिशय गलिच्छ झालेले आहे. अशा परिस्थितीत सकारात्मक विचारांचे आणि सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये येणे, ही समाजाची आणि काळाची गरज आहे.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केवळ शिक्षण नाही, तर आयुष्य घडविण्याचे काम होत आहे. युवा संसदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राजकारणामध्ये येऊन आपण यशस्वी होऊ शकतो, असा आत्मविश्वास संस्थेमुळे मिळत आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, तरुणांनी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार अंगीकारले पाहिजेत. संकटाला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. सकारात्मक विचारांनी कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. मनामध्ये निराशा न आणता प्रामाणिकपणे मार्गक्रमण करत राहिलो तर यश निश्चितच मिळते.

डॉ. बाबा आढाव म्हणाले, सनातन यांचे ओझे आपण किती वर्षापर्यंत बाळगणार आहे, असा प्रश्न मला नेहमी पडतो. नवीन विचार आणि नवीन काम हेच समाजाला नवीन दिशा दाखवून देणार आहे. त्यामुळे नवीन विचारांची प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या तरुणांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने पुरस्कार देऊन त्यांना बळ दिलेले आहे. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली तरी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आजही समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली नाहीत.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, अत्यंत दुष्काळी भागातील एका छोट्या गावातील माझा प्रवास सुरू झाला अनेक वाईट अनुभव आले अनेकांनी अपमान केला परंतु तो अपमान सकारात्मक पद्धतीने घेऊन आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळेच आज जाधवर ग्रुप सारखी शैक्षणिक संस्था उभी करू शकलो. विद्याधर अनास्कर, एस.के.जैन, फतेचंद रांका, संजय आवटे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविक केले.

अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड शहरात भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन; संपूर्ण पुणे विभागातून महिला होणार सहभागी
– शब्दांजली..! “वारकरी कीर्तन परंपरेतील महान कीर्तनकार – बाबा महाराज सातारकर”
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तब्बल 12 कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन


dainik maval jahirat

Previous Post

आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन

Next Post

निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा – 2023 च्या विजेत्या, बक्षिसांचा झाला पाऊस । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-MNS

निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा - 2023 च्या विजेत्या, बक्षिसांचा झाला पाऊस । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.