टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील आंदर मावळ भागातील ग्रुप ग्रामपंचायत इंगळून अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन करण्यात आले. येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी निवारा शेड अभावी नागरिकांना अंत्यविधी व दशविधी क्रियेच्या वेळी ऊन, वारा, पाऊस यामध्ये नागरिकांना बसावे लागत होते. त्या अनुषंगाने पारिठेवाडी येथील काही कार्यकर्त्यांनी होणाऱ्या समस्या संदर्भात राज्याचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे हा विषय सातत्याने लावून धरला होता.
त्यांच्या समस्येची दखल घेत माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या 2515 हेडच्या निधीतून मंजूर झालेल्या पारिठेवाडी येथील स्मशानभूमी निवाराशेडचे भूमिपूजन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दरम्यान याप्रसंगी मावळ पंचायत समिती माजी उपसभापती शांताराम कदम, टाकवे-वडेश्वर जि.प. गटाचे भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले, गणेश भांगरे, नामदेव भसे, सचिन पांगारे, सरपंच सुनीता सुपे, नारायण पांगारे, लक्ष्मण पाठारे, संचित पारिठे, रवी शिंदे, अमोल पारिठे, कांताराम तळपे, बबन पारिठे, सोमनाथ पाठारे, जयदास करंडे, ग्रामसेवक बाबर मॅडम, रवी जोरी, बाळू पारिठे, सुदाम पारिठे, विष्णू पारिठे, तानाजी मोधळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ( Bhoomipujan of Shelter Shed at Parithewadi under Group Gram Panchayat Englun )
अधिक वाचा –
– शब्दांजली..! “वारकरी कीर्तन परंपरेतील महान कीर्तनकार – बाबा महाराज सातारकर”
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तब्बल 12 कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही