Dainik Maval News : देहू नगर पंचायतीकडे मार्च अखेर मालमत्ता कर व पाणी कर मिळून 10 कोटी 5 लाख रुपयांचा कर जमा झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. देहू नगर पंचायतीकडे चालू आर्थिक वर्षातील व थकित असे मिळून मालमत्ता करापोटी 14 कोटी 20 लाख रुपये व पाणी करापोटी 3 कोटी 60 लाख रुपये वसुलीचे ध्येय होते.
- दरम्यान शासनाच्या शंभर टक्के कर वसुलीच्या धोरणानुसार नगरपंचायतीने तत्कालीन मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमून कर वसुली सुरू केली होती, यात जनजागृती करणे, थकबाकीदारांना नोटीस पाठविणे, नळजोड कनेक्शन तोडणे अशा कारवाया करण्या आल्या, दरम्यान कर वसुली दरम्यान जवळपास 150 हून अधिक थकबाकीदारांचे नळजोड तोडण्यात आले.
मार्च 2025 अखेर नगरपंचायतीकडे मालमत्ता करापोटी जवळपास 8 कोटी 70 लाख रुपये, तर पाणी आकारातील 1 कोटी 35 लाख असा एकुण 10 कोटी 5 लाख रुपये कर जमा झाला आहे. जरी मार्च महिना संपला असला तरीही नगर पंचायतीकडून थकबाकीदारांकडून कर वसुली सुरुच राहणार असल्याचे नगर पंचायत प्रशासनाने सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News