व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? 24 मे रोजी बाजार समिती सभापती पदाची निवडणूक, ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा

अत्यंत प्रतिष्ठेची आणि रंगतदार झालेली मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या पॅनलने 17-1 अशा फरकाने जिंकली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 22, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval-Bajar-Samiti-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


अत्यंत प्रतिष्ठेची आणि रंगतदार झालेली मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या पॅनलने 17-1 अशा फरकाने जिंकली. मागील महिन्यात दिनांक 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाली होती, त्यानंतर आता तब्बल 25 दिवसानंतर म्हणजेच येत्या 24 मे (बुधवार) रोजी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांनी ही माहिती दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी मित्र पक्ष पुरस्कृत सहकार पॅनल अशा दोन पॅनलमध्ये सरळ लढत होती. या निवडणूकीच्या निमित्ताने विद्यमान आमदार सुनिल शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत महाविकास आघाडीचे 17 उमेदवार निवडणूक आले आणि बाजार समितीवर मविआचा झेंडा रोवला गेला. ( Maval Agricultural Produce Market Committee Chairman Deputy Chairman Election on 24th May )

परंतू आता प्रत्यक्षात सभापती आणि उपसभापती पदासाठी मविआ पॅनलच्या विजयी उमेदवारांत मोठी रस्सीखेच असलेली पाहायला मिळत आहे. मविआ पॅनलमधील विजयी संचालकांमध्ये अनेक जुणे जाणते चेहरे आहेत, तसेच तालुक्यात चर्चेत असणारे अनेक नवखे चेहरेही आहेत. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागेल.

हेही वाचा – मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली

सभापती पदाचा मान आपल्याला मिळावा, यासाठी जरी अनेकांनी मोर्चे बांधणी सुरु केली असली तरीही आमदार सुनिल शेळके, बापू भेगडे, बबनराव भेगडे, माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वात कुणा एकाच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊन सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध होईल, असे बोलले जात आहे. मात्र तरीही इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकूण 17 पैकी सभापती पदासाठी चर्चेत असलेली प्रमुख 5 नावे आहेत, तसेच उपसभापती पद देऊन समाधान केले जाईल अशीही काही नावे चर्चेत आहेत.

‘या’ नावांची होतेय चर्चा…

सभापती पदाच्या चर्चेत सुभाष रघुनाथ जाधव, शिवाजी चिंधु असवले, संभाजी आनंदराव शिंदे, नामदेव नानाभाऊ शेलार आणि भरत दशरथ टकले ही नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. यातही सुभाष जाधव, शिवाजी असवले आणि संभाजी शिंदे यांची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

आता प्रत्यक्षात 24 मे रोजी ही सभापती आणि उपसभापतीची निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांनी सदर निवडणूकीची माहिती देताना सर्व सदस्यांना नोटीसा दिल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच 24 तारखेला शिक्षक सोसायटीच्या हॉलमध्ये ही निवडणूक होणार आहे. तेव्हा कुणाला सभापतीचा मान मिळणार आणि कोण उपसभापती म्हणून मिरवणार हे 24 तारखेलाच समजेल.

दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)

अधिक वाचा –
– आनंदवार्ता! श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Ashadhi Wari 2023
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case


dainik maval jahirat

Previous Post

किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! लेकानंतर वडीलांचाही कटात समावेश असल्याची माहिती । Kishor Aware Murder case

Next Post

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग, लोणावळ्यातील धक्कादायक घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग, लोणावळ्यातील धक्कादायक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.