मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. शुक्रवारी (दिनांक 21 एप्रिल) वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिरातून भाजपा प्रणीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आज (शनिवार, दिनांक 22 एप्रिल) रोजी महाविकास आघाडी मित्र पक्ष पुरस्कृत सहकार पॅनल यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसना (ठाकरे गट), एसआरपी, काँग्रेस आदी महाविकास आघाडीचे विविध घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पॅनलचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थिती होते. मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक – 2023 च्या निमित्ताने खुप दिवसांनी मावळ तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.
शनिवारी बापू भेगडे, गणेश खांडगे, बबनराव भेगडे, माऊलीभाऊ दाभाडे, मदन बाफना आणि आमदार सुनिल शेळके आदी नेते पदाधिकारी यांनी सर्वांना मार्गदर्शन करत बाजार समितीच्या निवडणूकीत आपल्याच पॅनलचा विजय होणार, असा एल्गार केला.
“शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करता या निवडणुकीत महाविकासआघाडी सहकार पॅनलमधील सर्व उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन करतो. तसेच सर्वांनी एकदिलाने काम करा. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपले विमान चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवून सहकार पॅनलला मतदानाचे आवाहन करावे. आजची एकजुट नक्कीच विजयाची नांदी ठरेल, हा विश्वास आहे.” असे मत यावेळी आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केले.
अधिक वाचा –
– लोणावळ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेश केदारी यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
– तळेगाव दाभाडे इथे सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांकडून स्वर्गीय खासदार गिरीष बापट यांना श्रद्धांजली