Dainik Maval News : राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापलेलं दिसत आहे. महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात सरळ लढत होत असलेल्या मावळ विधानसभेत सध्या दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान शनिवारी (दि.9) लोणावळा येथे प्रचार रॅली दरम्यान शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
शनिवारी (दि. 9 नोव्हेंबर) महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांची लोणावळा शहरात पूर्वनियोजित प्रचार रॅली होती. तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यासाठी बाळा भेगडे, रविंद्र भेगडे आदी नेत्यांनी प्रचार रॅलींचे आयोजन केले होते. यादरम्याव भांगरवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास उमेदवार सुनिल शेळके आणि बापू भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
भांगरवाडीतील राम मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर जात असलेल्या उमेदवार सुनिल शेळके यांच्याबाबत बापू भेगडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांपैकी कुणीतरी घोषणा दिली. त्यानंतर शेळके यांच्या बाजूनेही प्रत्युत्तर आले. त्यातून नंतर ही घोषणाबाजी आणि बाचाबाची वाढत गेली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिळविला आणि दोन्ही रॅलीचे मार्ग सुकर केल्याने कुठलाही अनुचित प्रचार घडला नाही.
परंतु या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे मावळ विधानसभेची निवडणूक किती अटीतटीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. ते समजून येते. दरम्यान उमेदवार सुनील शेळके यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले असून विरोधक जाणूनबुझून असे प्रकार करीत आहेत, असे म्हटले आहे. विरोधी पक्षातून बाळा भेगडे यांनी उमेदवार शेळके यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचे म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभेतील उमेदवारांना खर्च निरिक्षकांच्या नोटीसा ; खर्चाचे अपूर्ण सादरीकरण केल्याने नोटीस । Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बसचा अपघात ; बसमधील २६ प्रवासी जखमी
– शिरगावातील श्री साई मंदिर परिसरात मतदार जनजागृती अभियान, मावळ पंचायत समितीचा उपक्रम । Maval Vidhan Sabha