Dainik Maval News : 204 मावळ विधानसभा मतदार संघा करिता छाननी अंती 12 उमेदवार पात्र वैध नामनिर्देशीत झाले होते. त्यातील एकूण 6 उमेदवारांनी सोमवारी (दि.4) आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण 6 उमेदवार असणार आहेत.
निवडणूकीतून माघार घेतलेले उमेदवार
1. विधान सुधीर तरबदार.
2. दादासाहेब किसन यादव.
3. रविंद्र आण्णासाहेब भेगडे
4. सुरेश्वरी मनोजकुमार देवरे
5. रुपाली राजेंद्र बोचकिरी
6. संतोष रंजन लोखंडे
तसेच दुपारी तीन वाजेपर्यंत सहा पात्र उमेदवारांचे निवडणुकीकरिता अंतिम यादी निश्चित केली आहे. तसेच 3 नंतर अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे देखील वाटप करण्यात आले आहे.
अंतिम उमेदवारांची यादी आणि त्यांचे निवडणूक चिन्ह
1. सुनिल शंकरराव शेळके, चिन्ह – घड्याळ, पक्ष – NCP
2. रविद्र नानाभाऊ वाघचौरे, चिन्ह – ऑटो रिक्षा, पक्ष – भिमसेना
चार अपक्ष उमेदवार खालील प्रमाणे,
1. अगरवाल मुकेश मनोहर, चिन्ह – कपाट
2. आण्णा उर्फ बापू भेगडे, चिन्ह – ट्रम्पेट
3. गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, चिन्ह – प्रेशर कुकर
4. पाडूरंग बाबूराव चव्हाण, चिन्ह – शिट्टी
वरील प्रमाणे सहा उमेदवार निवडणूक लढवणार असून येत्या 20/11/2024 रोजी मतदान होवू घातले आहे. तर 23 तारखेला मतमोजणी असणार आहे. अशी माहिती 204 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे. उमेदवारांना भारत निवडणूक आयोगाचे मुक्तचिन्ह तक्त्यानुसार चिन्ह वाटप करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime
– मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News
– वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval