पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांत केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सातत्याने अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, जल जिवन मिशन, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री अवास योजना, स्वच्छ भारत मिशन आदी योजनांचा समावेश आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वर्ष 2014 ते 2024 पर्यंत देशातील 25 कोटी नागरिकांना या योजनांचा लाभ झाल्याची आकडेवारी आहे. मावळ तालुक्यात (Maval Taluka) देखील जवळपास 23 हजारच्या आसपास केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे संपर्क अभियान मावळ भाजपाने (Maval BJP) सुरु केले आहे. शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, कुसगाव पमा, पाचाणे, पुसाणे , दिवड, ओवळे, आढले बु. आदी गावातील लाभार्थ्यांची पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मावळ भाजपाचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष रामदास गाडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maval BJP Contact Campaign interact with beneficiaries of Modi Government )
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार! किती टप्पे? कधी मतदान? कधी मतमोजणी? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार । Lok Sabha Elections 2024
– मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप । Maval News
– इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाने घेतला वेग, आंदर मावळातील पर्यटनाला मिळणार चालना । Maval Taluka News